संतापजनक! भरस्त्यात अन् भरदुपारी २३ वर्षीय विवाहितेसोबत पाप! गळ्यात हात टाकून ओढणी ओढली अन्.... बुलडाणा शहरातील घटना..

 
बुलडाणा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शांतताप्रिय शहर अशी ओळख असलेल्या बुलढाणा शहरातूनच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भररस्त्यात विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना बुधवार, २० मार्च रोजी घडली. याप्रकरणी पीडितेने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून प्रशांत शिवा गायकवाड (३५ वर्ष रा. क्रांतीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवडी बाजारातून घरी जात असताना प्रशांत गायकवाड हा अचानकपणे पाठीमागून आला. आणि त्याने पीडितेच्या गळ्यात हात घालून तिची ओढणी ओढली. त्यामुळे पीडित विवाहिता खाली कोसळली. त्यावेळी त्याने तिचा वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केला.असे तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी प्रशांत गायकवाड याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शांतता प्रिय शहर म्हणून बुलढाणा शहराची ओळख आहे. मात्र अलीकडच्या काळात वाढत चाललेली गुन्हेगारी शहरासाठी घातक ठरत चालली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. भररस्त्यात विवाहितेवर विनयभंग होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.