पराभव पचेना..! डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मनोज कायंदे यांच्या विजयाला आव्हान; उच्च न्यायालयात दाखल केली याचिका! पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा महायुतीच्या मनोज कायंदे यांनी विजय मिळवला. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊन देखील महाविकास आघाडीचे डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा पराभव झाला. दरम्यान हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळेच मनोज कायंदे यांच्या विजयाला डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुरात खंडपीठात आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे विदर्भातील ८ उमेदवारांनी ही याचिका दाखल केली आहे. निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून हस्तक्षेप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढलेले काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी देखील फडणवीस यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. ॲड.आकाश मुन व ॲड.
 पवन डहाट हे याचिका दाखल करणाऱ्या उमेदवारांचे वकील आहेत. निवडणुकीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागते. मात्र ईव्हीएमने निवडणुका घेण्याआधी निवडणूक आयोगाने कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. ईव्हीएमने निवडणूक घेण्याआधी आयोगाने नोटीफीकेशन काढले नसल्याचेही ॲड. गुडधे म्हणाले.
पैसे भरले पण...
निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतर देखील सीसीटीव्हीचे फुटेज आणि फॉर्म नंबर १७ दिल्या जात नाहीत. ५ व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्याची मान्यता आहे मात्र यासाठी अनेक उमेदवारांनी पैसे भरून देखील मोजणी सुद्धा करण्यात आलेली नाही. आमचे हक्क डावलण्यात येत आहेत असा आरोप याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. गुडधे यांनी केला...