बुलडाणा, चिखली, नांदुरा, मेहकर कोरोनाच्या हिटलिस्टवर!
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1280 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1063 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 217 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 155 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 62 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 300 तर रॅपिड टेस्टमधील 763 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 83, बुलडाणा तालुका : सागवन 1, सातगाव 2, देऊळघाट 1, नांद्राकोळी 1, चिखला 1, पांगरखेड 1, डोंगरखंडाळा 1, येळगाव 1, चिखली शहर : 21, चिखली तालुका : जांभोरा 1, एकलारा 3, उंद्री 1, कटोडा 1, इसरूळ 1, देऊळगाव घुबे 1, धोत्रा नाईक 1, कोलोरी 1, किन्होळा 1, महिमळ 1, साकेगाव 1, सातगाव भुसारी 1, अंबाशी 1, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : बोराखेडी 1, मेहकर शहर : 9, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, मलकापूर शहर : 16, नांदुरा शहर : 18, नांदुरा तालुका : वडनेर 1, पिंपळखुटा 2, खामगाव शहर : 13, खामगाव तालुका : पिंपळगाव राजा 1, शेगाव शहर : 8, देऊळगाव राजा शहर :1, देऊळगाव राजा तालुका : मंडपगाव 2, देऊळगाव मही 2, टाकरखेड भागिले 1, अंढेरा 1, गोळेगाव 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 2, जळगाव जामोद शहर :2, जळगाव जामोद तालुका : पिंपळगाव काळे 2, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 1, परजिल्हा : कसुरा ता. बाळापूर 1, थार ता. तेल्हारा 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 217 नवीन संशयीत व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहे.
३३ रुग्णांना डिस्चार्ज
उपचाराअंती 33 रुग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 760121 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत 87113 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 877 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 88844 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या कोविडचे 1055 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 676 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.