अवकाळी काही ऐकत नाही! हवामान खाते म्हणते, जिल्ह्यात पुन्हा ५ दिवस धो धो; "हे" ३ दिवस धोक्याचे! शेतकऱ्यांना दिलाय महत्वाचा सल्ला..

 
nature
बुलडाणा(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या एप्रिल सुरू असला तरी उन्हाळा आहे पावसाळा हे मात्र समजायचा पत्ता नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने विविध भागात अवकाळी पाऊस झोडपत आहे. अशात पुन्हा पुढील ५ दिवसाचा हवामान अंदाज प्राप्त झालाय. त्यात पुढील ५ दिवस जिल्ह्यावर अवकाळीचे संकट असल्याचे सांगण्यात आले आहे.
 

 २१ ते २५ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा गडगडात होण्याची शक्यता आहे. तर २१,२४ व २५ एप्रिल या दिवशी तुरळक ठिकाणीं वादळी वाऱ्यासह,विजांचा गडगडाट व अवकाळी पावसाची शक्यता असल्याने हे तीन दिवस धोक्याचे मानले जात आहेत.
   
शेतकऱ्यांना हा सल्ला..!

 वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता पाहता शेतकरी बंधूंनी कापणी केलेल्या शेतमालाची, भाजीपाल्याची व तोडणी केलेल्या फळांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच संबंधित शेतमाल, भाजीपाला व फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.सध्याचे तापमान व वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकांचे अवशेष जाळू नयेत.सध्याची हवामान परिस्थिती पाहता पिकांना ,फळबागांना व भाजीपाला पिकांना वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसू नये म्हणून नियमितपणे शक्यतो सुक्ष्म सिंचन पद्धतीने ओलीत करावे.कांदा पीक परिपक्व अवस्थेत असताना किंवा काढणीच्या ८-१५ दिवस अगोदर ओलीत बंद करावे. त्यामुळे कांदा काढणे सोयीचे होईल.मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत.जनावरांना उघड्यावर चरायला जाऊ न देता, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था गोठ्यातच करावी.विजांबाबत अचुक पुर्वसुचना प्राप्त होण्यासाठी व जिवीतहानी टाळण्यासाठी शेतकरी बंधूंनी दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा.