बुलडाण्याच्या शिवशंकरनगरात ३ कोरोनाबाधित!; जिल्ह्यात दिवसभरात ५ नव्या रुग्णांची भर

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 4 जानेवारीला कोरोनाचे 5 नवे रुग्ण समोर आले आहेत. बुलडाणा शहरातील शिवशंकरनगरातील 3, शेगाव शहरातील श्रीरामनगरातील 1 आणि परजिल्ह्यातील पातूर तालुक्‍यातील गोंधळवाडीचा 1 रुग्ण बुलडाण्यात पॉझिटिव्‍ह आढळला आहे. त्‍यामुळे सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 24 वर गेली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 339 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 334 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 5 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 2 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 3 अहवालांचा समावेश आहे.

निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 72 तर रॅपिड टेस्टमधील 262 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 748922 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86989 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

आज रोजी 496 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 748922 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87689 कोरोनाबाधित रुग्ण असून, पैकी 86989 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 676 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.