दिवसभरात कोरोनाचे नवे २ पॉझिटिव्ह रुग्ण!
१४ रुग्णांवर उपचार सुरू
Updated: Oct 22, 2021, 16:28 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 21 ऑक्टोबरला कोरोनाचे नवे 2 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. यातील एक बुलडाण्याच्या एकतानगरातील व दुसरा रुग्ण शेगावच्या एसबीआय कॉलनीतील आहे. दिवसभरात एक रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात 14 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 418 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 416 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 119 तर रॅपिड टेस्टमधील 297 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 727856 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86918 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 55 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87606 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.