टोमॅटो जीवनावश्यक गोष्ट नाही; ते खायला मिळाले नाही म्हणून पाय खोरून खोरून कुणाचा मृत्यू झालेला नाही; शेतकऱ्याच्या खिशात चार पैसे जास्त जात असतील तर सगळ्यांनी सहकार्य करण्याची गरज!

 

टोमॅटो भाववाढीवर रविकांत तुपकर काय म्हणाले.. पहा व्हिडिओ..!

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): टोमॅटो चे भाव वाढल्याने ते  नियंत्रित करण्यासाठी सरकार हालचाल करीत असल्याच्या वृत्तावर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठयावर होता,तेव्हा आता ओरड करणारे कुठे होते असा सवाल त्यांनी केला आहे.

टोमॅटोचे भाव पडले तेव्हा उभ्या पिकात शेतकऱ्यांनी जनावरे घातली. उत्पादन खर्चही निघाला नाही.  तेव्हा  भाव वाढवण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न का केले नाहीत? टोमॅटो ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही. टोमॅटो खाल्ले नाही,किंवा खायला मिळाले नाही म्हणून पाय खोरून खोरून कुणी मेले असे कधी घडले नाही. त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढल्याने एवढी ओरड करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जास्तीचे जात असेल तर सगळ्यांनी सहकार्य केले पाहिजे असे रविकांत म्हणाले.