स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! घरफोडीच्या १४ गुन्ह्यांची उकल! अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या;६ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त!
Jan 30, 2024, 10:20 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील काही दिवसांत जिल्ह्यात घरफोडीच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या.त्यामध्ये खामगाव, चिखली, बोराखेडी, डोणगाव,मेहकर , बुलडाणा अश्या ठिकाणी जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल होते. यातीलच १४ गुन्ह्याची उकल करण्यात गुन्हे शाखा यशस्वी झाली आहे. त्यामध्ये एकूण ६ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल करण्यात आला, तर पाच अट्टल चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जाहिरात 👆
खामगाव येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीतांची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या गुन्हातील आरोपींना जालना जिल्ह्यातील मंठा, बिरेगाव येथून अटक करण्यात आली आहे.बाबासाहेब शिंदे (रा. विरेगाव जि. जालना), विलास पवार(रा बीड),अमोल पवार (रा. बीड) दीपक शिंदे (रा.जालना),पांडू पवार ( मंगरूळ) अशी आरोपींची नावे आहे आहेत. तपासा दरम्यान त्यांनी चोरीची २ घरफोडीचे १४ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, व गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यारे असे मिळून एकूण ६ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई!
विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव विनोद ठाकरे, यांच्या मार्गदर्शनात ही पथके तैनात करण्यात आली. गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक एन. लांडे, सपोनि, विलासकुमार सानप, नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, पोउपनि, श्रीकांत जिंदमवार, सचिन कानडे, पोलीस अंमलदार रामविजय राजपूत, राजकुमार राजपूत, शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, जगदेव टेकाळे, दिनेश बकाले, पंकज मेहेर, एजाज खान, दिगंबर कपाटे, पोना, गजानन दराडे, गणेश पाटील, युवराज राठोड, पुरुषोत्तम आघाव, अनंता फरताळे, सतिष हाताळकर, मपोना, वनिता शिंगणे, पोकों, गजानन गोरले, अमोल शेजोळ, वैभव मगर, अजीज परसुवाले, मनोज खरडे, दिपक वायाळ, शिवानंद मुंढे, विलास भोसले-स्था.गु.शा. बुलढाणा, राजू आडवे तांत्रीक विष्लेषण विभाग, सायबर पो.स्टे., बुलढाणा, पोना, संदिप शेळके, पोकॉ. अमोल तरमळे, योगेश सरोदे सी. एम.एस. विभाग, पो.अ. कार्यालय, बुलढाणा यांचे पथकाने तसेच पोलीस ठाणे खामगांव शहर येथील पोउपनि पंकज सपकाळ, पोलीस अंमलदार प्रदिप मोठे, रविंद्र कन्नर, राहूल धारकर, अंकूश गुरूदेव, सागर भगत, गणेश कोल्हे यांनी सदर कारवाई पार पाडली.