देशात संविधान गुंडाळण्याची प्रकिया सुरू, सावध व्हा! काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे प्रतिपादन!

माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,भाजपची मंडळी देश नासवायला निघाली! भालगावात संविधान जागर यात्रेचे दिमाखात स्वागत, भानखेडमध्येही प्रतिसाद..
 
Rb
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. मात्र आता या संविधानाचा गळा घोटण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.डोक्यात धार्मिकतेच विष कालवून देश लुटण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे सावध व्हा असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. चिखली विधानसभा मतदारसंघात आजपासून संविधान जागर यात्रा सुरू झाली, यावेळी पहिली सभा भालगावात पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह चिखली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  Public
यावेळी पुढे बोलताना राहुल बोंद्रे म्हणाले की, देशात संविधान आणि लोकशाही जिवंत राहिली तर आमचे व आमच्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित राहील अन्यथा भविष्य अंधकारमय होईल. आम्हाला गुलाम बनवण्याच षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी रचले आहे त्यामुळे सावध व्हा, सजग व्हा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
  भाजपची मंडळी देश नासवायला निघाली..
 यावेळी बोलतांना बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हा देश मूठभर लोकांचा नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे. मात्र तरीही सत्ता मूठभर लोकांच्या हातात एकवटली आहे. आपला देश सध्या हम दो हमारे दो..म्हणजेच मोदी,शहा आणि अदानी, अंबानी यांच्या इशाऱ्यावर चालू आहे. उद्योगपतींच्या हितासाठी देशाची वाट लावण्याचे काम सत्ताधारी भाजपवाले करीत आहेत असा आरोप माजी आमदार सपकाळ यांनी केला. भाजपची मंडळी देश नासवायला निघाली आहेत, त्यामुळे अशा भाजपच्या लोकांना धडा शिकवण्याचे काम करावे लागेल असेही ते म्हणाले. संविधान जागर यात्रेचे भालगाव नंतर भानखेड मध्येही फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.