...म्‍हणून रूद्र आरओ सेल्स अन्‌ सर्व्हिसेसवर आहे लोकांचा इतका विश्वास!

 
बुलडाणा (विपणन प्रतिनिधी, मो. ९८२२९८८८२०) : आई-वडिलांचा आशीर्वाद, मोठे भाऊ-वहिणी, पत्‍नीचा खंबीर पाठिंबा, व्यवसायात यशस्वी होण्याची जिद्द, अंगी प्रामाणिकपणा अन्‌ मेहनती स्वभाव सोबत कर्तव्यदक्षता... रूद्र आरओ सेल्स अॅन्ड सर्विसेसचे मालक नीलेश पंडीत जगताप यांच्या यशाची ही कारणं..!  बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील मुंगळे कॉम्प्लेक्समध्ये त्‍यांचे दालन आजघडीला अनेकांच्या कौतुकाचे कारण ठरते.

535

३२ वर्षीय नीलेश जगताप बुलडाण्याच्या इंदिरानगरात राहतात. वडील पंडीत प्रभाकर जगताप पाटबंधारे विभागात नोकरीला होते. पदवी घेतल्यानंतर कुणाची गुलामगिरी केल्यापेक्षा व्यवसायात नशिब आजमाविण्याचा निर्णय त्‍यांनी घेतला. त्‍याआधी त्‍यांनी ६ महिने पीओपीचे कामही केले, डॉक्टरकडे १ वर्ष काम केले. गौरव टाकसाळ नावाचा त्‍यांचा मित्र आरओ रिपेरिंगचे काम करत होता. २ वर्षे त्याच्यासोबत राहून नीलेश जगताप हे काम शिकले आणि नंतर स्वत:च रिपेअरिंगची कामे करू लागले. या कामात आत्मविश्वास वाढल्याने मयूर देशमुख या मित्रासोबत त्‍यांनी पार्टनरशिपमध्ये दुकान सुरू केले.

२ वर्षे दुकान चालवले. मग ते दुकान बंद करून मुंगळे कॉम्प्लेक्समध्ये भाड्याने दुकान घेऊन परत सुरू केले. दोन वर्षांनी मित्र वेगळे झाले आणि स्वतंत्रपणे व्यवसायात उतरले. स्वत:चे दुकान टाकायचा निर्णय घेतला तेव्हा नीलेश जगताप यांची परिस्थिती नाजूक होती. मोठे भाऊ संजय जगताप रंगकाम करतात. भावाने त्‍यांना व्यवसायासाठी १३ हजार रुपये मदत म्हणून दिले. त्यावेळी १३ हजार रुपये नीलेश यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. मुंगळे कॉम्प्लेक्समध्ये त्‍यांनी पुन्हा भाड्याने दुकान घेतले.

१ जानेवारी २०२० रोजी स्वतःचे दुकान सुरू केले, असे नीलेश जगताप यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. त्‍यांच्या रूद्र आरओ सेल्स अॅन्ड सर्विसेस या दालनात सर्व प्रकारचे आरओ आणि त्‍याचे स्पेअर पार्ट मिळतात. विक्रीपश्चात सेवाही ते तत्‍परतेने देतात. ॲक्‍वा शार्प, फोलीक्स, ॲक्‍वा फ्रेश, ॲक्‍वा ग्रँड, लिव्हप्युर या नामांकित कंपन्यांची शहरासाठीची डिलरशिपही त्‍यांनी घेतली आहे. ज्यांना आरओ पाण्याचा व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी १ हजार लिटरपर्यंतचा प्लांटही ते टाकून देतात.  पाण्याचे एटीएमसुध्दा त्‍यांच्याकडे आहे, असेही त्यांनी सांगितले.
 

42432

विक्री पश्चात सेवेमुळे लौकिक वाढला...
विक्रीपश्चात सेवेमुळे रूद्र सेल्स अॅन्ड सर्विसेसचा लौकिक वाढला आहे. ज्या दिवशी ग्राहकाने कॉल केला, त्याचदिवशी ते काम पूर्ण होण्याकडे नीलेश जगताप यांचा कटाक्ष असतो. आजचे काम उद्यावर ढकलले जात नाही. याशिवाय सर्विस चार्ज केवळ ९९ रुपये आहे. ग्राहकाचे समाधान होत नाही तोपर्यंत सेवा दिली जाते, हे विशेष.
उधारी नको रे बाबा...
व्यवसायात येणाऱ्या पिढीला सल्ला देताना श्री. जगताप म्‍हणतात, की जिद्द, चिकाटीने काम करा. तुमचे यश तुम्हाला नक्कीच मिळणार. १० ग्राहकांपेक्षा एक ग्राहक कमी करा. पण व्यवसायात उधारी हा विषयच ठेवू नका. उधारीमुळे संबंध खराब होतात. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या, असेही त्यांनी सांगितले.
कौटुंबिक पार्श्वभूमी...
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या नीलेश जगताप यांचे वडील पंडीत जगताप जिल्हा पाटबंधारे विभागात शिपाई होते. २०१७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्‍यांची आई सौ. कल्पना घरी असतात. २ बहिणी आहेत. त्यांचे लग्न झालेले आहे. मोठा भाऊ आणि वहिनी तसेच मी आणि माझी पत्नी आणि मोठ्या भावाला दोन मुली आहे तर मलासुध्दा २ जुळ्या मुली आहेत, असे त्‍यांनी सांगितले