...म्‍हणून ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवू नका!

 
MONEY
मुंबई ः अनेक जण ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवू नका, असा सल्ला देत असतात. यामागचे कारणही तसेच आहे. अर्थात ते नियमशीर चालणाऱ्यांना धोकादायक नाही. पण नियमांना फाटा देऊन ज्‍यांना ५ लाखांपेक्षा अधिक रुपये बँकेत ठेवायचे असतात, त्‍यांना धोकादायक आहे. याशिवाय आणखी एक कारण आहे. ते म्‍हणजे बँक बुडाली तर सरकारकडून केवळ ५ लाख रुपयांपर्यंतच्याच रकमेचीच सुरक्षितता दिली जाते. म्‍हणजे सरकार ५ लाख रुपयेच देते. मग भलेही तुमचे बँकेत १ कोटी का ठेवलेले असेना. अर्थात सरकार कोणतीच राष्ट्रीयीकृत बँक बुडू देत नाही. बँक बुडायला लागली की त्‍या बँकेचे लगेच दुसऱ्या मोठ्या बँकेत विलिनीकरण होते. त्‍यामुळे इतके घाबरायचे कारण नाही.
बँक बुडालीच तर खातेदारांना पेमेंट करण्यासाठी DICGC संस्‍था जबाबदार असते. कारण ती बँकेकडून रकमेच्या हमीसाठी प्रिमियम आकारत असते. तुम्‍ही हवे तितके पैसे बँकेत ठेवा, पण तुमच्याकडे जर त्या उत्‍पन्नाचा स्‍त्रोत नसेल आणि आयकर तुम्‍ही भरला नसेल तर मात्र तुम्‍ही अडचणीत येऊ शकता. आयकर विभागाने तुम्‍हाला विचारले की हे पैसे कुठून आणले आणि तुम्‍हाला सांगता आले नाही तर तुमची खैर नाही. अशावेळी तुमच्‍यावर कारवाई तर होईलच पण तुमचे खातेही गोठवले जाईल. सेव्हिंग अकाऊंटमध्ये राहणाऱ्या पैशावर व्याज कमी आहे. त्‍यामुळे नफा-तोट्याची काळजी घेतलेली बरी. असे पैसे ठेवण्यापेक्षा फिक्स डिपॉझिट करा किंवा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा.