रविकांत तुपकारांची विदर्भ इरिगेशन कंपनीला भेट

म्हणाले, उत्पादन दर्जेदार!!
 
file photo
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेते रविकांत तुपकर यांनी नुकतीच मोताळा येथील विदर्भ इरिगेशन कंपनीला भेट दिली. विदर्भ ठिबकचे संचालक कैलास गावंडे यांनी तुपकरांचे स्वागत केले. यावेळी श्री. गावंडे यांनी तुपकर व शेतकऱ्यांना कंपनीची आणि उत्पादनांची माहिती दिली. तुपकरांनीदेखील कंपनीत फिरून कच्चा माल, उत्पादनाची प्रत आणि उत्पादन प्रक्रिया जाणून घेतली. विदर्भ ठिबकचे उत्पादन दर्जेदार आणि उच्च दर्जाचे असल्याचा विश्वास यावेळी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना शेती अवजारे आणि इतर शेतीपूरक गोष्टी दर्जेदार मिळत नाहीत. मात्र विदर्भ ठिबकचे उत्पादन अतिशय दर्जेदार आहे. शेतकऱ्यांनी ते प्राधान्याने घ्यावे, असे तुपकर यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना म्हणाले. कंपनीचे संचालक कैलास गावंडे हे शेतकरी पुत्र आहेत. त्यामुळे ते शेतकरी हिताचा विचार करतात, असेही तुपकर म्हणाले. यावेळी मोताळा पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सरोदे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण शेलकर, के. टी. देशमुख, स्वाभिमानीचे मोताळा तालुकाध्यक्ष सय्यद वसीम, राजूरचे उपसरपंच शुभम मेढे, स्वाभिमानीचे विभागप्रमुख दत्ता पाटील, सागर मेढे, नितीन पुरभे, नीलेश पुरभे, सोपान माहोरे तसेच विदर्भ इरिगेशन सिस्टीम प्रा. लि. कंपनीचे जनरल मॅनेजर नीलेश शिंबरे उपस्थित होते.