विश्वकर्मा महिला अर्बन पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
Dec 14, 2021, 21:26 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील विश्वकर्मा महिला अर्बन पतसंस्थेत १२ डिसेंबर रोजी दुपारी पतसंस्थेच्या नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. कमलताई बुधवत यांच्या हस्ते झाले.
संस्थेच्या कार्याबद्दल व अल्पावधीतील यशाबद्दल सौ. बुधवत यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी सौ. भाग्यश्री खेडेकर, सौ. पाटील, विश्वकर्मा महिला अर्बन पतसंस्था अध्यक्षा अलका सुरोशे, उपाध्यक्षा सौ. आशाताई इंगळे, कार्यकारी संचालिका सौ. दीपाली खोलाडे, संचालिका सौ. सोनुने, सौ. बोराडे, सौ. भारुडकर, सौ. मुऱ्हेकर यांच्यासह बहुसंख्या महिला सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी दत्ता सपकाळ, उज्ज्वला हिवाळे यांनी पुढाकार घेतला.