"राजपूत" दातांच्या दवाखान्याचे आज चिखलीत उद्घाटन! डॉ.सागर ठेंग यांच्या आई वडिलांचे हस्ते होणार उद्घाटन; अनाथांसाठी मोफत उपचार होणार,

आजी - माजी सैनिकांच्या परिवाराला उपचारावर मिळणार ५० टक्के सूट; दातांच्या सर्वच आजारांवर होणार उपचार; डॉ. ठेंग म्हणाले..

 
Ggfh
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  डॉ.सागर अनंतराव ठेंग यांच्या "राजपूत दातांचा दवाखाना" चे आज, १ मे रोजी महाराष्ट्रदिनी उद्घाटन होणार आहे. अत्याधुनिक सोयी तसेच उपचार पद्धतीनी युक्त असलेला हा दवाखाना समाजसेवेसाठी कायमच समर्पित राहील अशी भावना डॉ.ठेंग यांनी व्यक्त केली आहे.

 Ghuf

डॉ. सागर ठेंग यांचे आई वडील सौ.अलका व श्री. अनंतराव पुंडलिक ठेंग यांच्या हस्ते राजपूत दातांचा दवाखाना व इम्प्लांट सेंटर व भारत स्वस्त औषधी सेवा केंद्राचे उद्घाटन होतेय. चिखली शहरातील बस स्टँड च्या मागे हिरा गेस्ट हाऊसच्या तळमजल्यावर हे दालन असणार आहे. अत्याधुनिक क्ष किरण सुविधा, कृत्रिम दंतोपचार पद्धती, दातांच्या नसेचे उपचार, अशंत: व संपूर्ण कवळी बसवणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, मशीनद्वारे दात साफ करणे, दातांच्या रंगाचे सिमेंट व चांदी भरणे तसेच लहान मुलांचे दातांचे उपचार करण्याची सुविधा राजपूत दातांच्या दवाखान्यामध्ये आहे. आपल्याला समाजाचे ऋण फेडता यावे या भावनेतून डॉ.ठेंग यांनी अनाथांसाठी मोफत उपचार तसेच आजी माजी सैनिकांच्या परिवारासाठी उपचारात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ ठेंग यांच्या या निर्णयाचे सामाजिक स्थरातून कौतुक होत आहे.