बुलडाण्यात आजपासून जिल्हास्तरीय कृषी महोत्सव! कृषि महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन; शेतकऱ्यांसाठी प्रदर्शनी;विविध विषयांवर होणार मार्गदर्शन
कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार ॲड. किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे आदी उपस्थित राहतील.
कृषी महोत्सवात काय?
या महोत्सवात शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रिसीडयू फ्री ॲण्ड ऑर्ग्यानिक मिशन इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी हे सेंद्रीय शेतीचे महत्व आणि प्रमाणीकरण, दुपारी दोन वाजता जय किसान शेतकरी गट वाशिमचे संचालक डॉ. संतोष चव्हाण शेती बांधावर जैविक उत्पादने तयार करण्याबाबत ऑन फार्म लॅबची माहिती देतील. दुपारी चार वाजता युनिवर्स ॲग्रो एक्सपोर्टचे प्रविण वानखडे कृषि निर्यात, ग्लोबल, गॅप, ट्रेसॅबीलीटी, निर्यातीचे गुणवत्ता संदर्भातील निकषाबाबत मार्गदर्शन करतील.
शनिवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता डॉ. सुभाष टाले शेतावर करावयाचे मृद व जलसंधारण तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्राच्या विषयतज्ज्ञ डॉ. प्रणीता कडू पीएमएफएमई अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग आणि संधी, तर सिताफळ महासंघचे अध्यक्ष श्याम गट्टाणी सिताफळ लागवड आणि प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करतील.
रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रेशिम संचालनालयाचे सहायक संचालक महेंद्र ढवळे रेशीम उद्योग व्यवसाय, संधी व बाजारपेठेबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता ग्रीन ॲग्रो बाजार एक्सपोर्टचे संदिप शेळके शेतकरी उत्पादक कंपनी यांना निर्यातीतील संधी, तसेच दुपारी चार वाजता संजय वाघ ग्लोबल गॅप, फायटोसॅनिटरी, न्युनतम अंश मर्यादा याबाबत मार्गदर्शन करतील.
सोमवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक डॉ. योगेश इंगळे संत्रा पिक व्यवस्थापन, दुपारी दोन वाजता विषयतज्ज्ञ श्रीमती के. सी. गांगडे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन करतील.
मंगळवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व बाजारपेठ याबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता कृषि महोत्सवाचा समारोप करण्यात येईल. या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.