"नाथ बायो जीन्स'तर्फे पीक पाहणी कार्यक्रम

 
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंचली (ता. सिंदखेड राजा) येथील गजानन काटे यांच्‍या शेतात नाथ बायो जीन्स लिमिटेड (औरंगाबाद) या कंपनीचा जम्बो ३०३ कपाशी व डॉमिनेटर ४०१ या वाणांच्‍या पीक पाहणीचा कार्यक्रम नुकताच झाला.

यावेळी देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील १३५ विक्रेते व कंपनीचे तीन अधिकृत विक्रेते कृषी क्रांती केंद्र देऊळगाव राजा, वैष्णवी ॲग्रो सेंटर सिंदखेड राजा व श्रद्धा कृषी केंद्र देऊळगाव मही यांच्‍या संचालकांची उपस्‍थिती होती. कंपनीचे जिल्हा मॅनेजर पांडुरंग देशमुख यावेळी म्‍हणाले, की जम्बो ३०३ या वाणाचे बोंडे ८० ते ९० प्रति झाड आहे. प्रत्येक बोंडामध्ये पाच पाकळ्या असल्याचे दिसून आले आणि जम्बो ३०३ हा वाण शेवटपर्यंत हिरवागार दिसून आला व जम्बो ३०३ या वाणामध्ये उत्पादन जास्त देण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले. कंपनीच्‍या मका या पिकाचे डॉमिनिटर ४०१ हा वाणसुद्धा रब्बी हंगामात व खरीप हंगामात लावण्यास उपयुक्त असल्याचे विक्रेते व कंपनी प्रतिनिधींनी सांगितले. कार्यक्रमासाठी अमोल तायडे (कंपनी प्रतिनिधी) यांनी पुढाकार घेतला. आभार कंपनीचे विभागीय अधिकारी नरेंद्र पांडे यांनी केले.