व्वा क्या बात! पहेल इन्स्टिट्यूटचा असाही सामाजिक उपक्रम; आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना देणार मोफत शिक्षण; उद्या होणार प्रवेशपरीक्षा; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनो,

पालकांनो ही बातमी वाचाच..

 
market
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात अल्पावधीत नावलौकिक प्राप्त करणाऱ्या पहेल  इन्स्टिट्यूट ने सामाजिक दायित्वही जोपासले आहे.   डॉक्टर बनण्यासाठी जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना कोटा, लातूर, संभाजीनगर, अकोला येथे जावे लागत होते. मात्र पहेल इन्स्टिट्यूट ने बुलडाणा जिल्ह्यातच उच्च दर्जाच्या शिक्षणाची सोय अल्प रकमेत उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पहिल्या निकालात पहेल इन्स्टिट्यूट ने दणकेबाज कामगिरी केली आहे. दरम्यान सध्या १० व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहेल इन्स्टिट्यूट ने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.

११ वीत विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन नीट ची तयारी करण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी पहेल इन्स्टिट्यूट ने उपलब्ध करून दिली आहे. उद्या १३  नोव्हेंबरला पहेल इन्स्टिट्यूट ने बुलडाणा येथे एका प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या वर्ग १० वीत शिकणारे विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरणार आहेत.  या प्रवेश परीक्षेद्वारे निवडण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना पहेल इन्स्टिट्यूट मोफत शिक्षण देणार आहे. याशिवाय इतर पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुध्दा देण्यात येणार असल्याचे पहेल इन्स्टिट्यूटच्या वतीने सांगण्यात आले आहे. उद्या १३ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता बुलडाणा शहरातील चैतन्यवाडी भागात  पहेल इन्स्टिट्यूटला ही प्रवेश परीक्षा होणार असून या परीक्षेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.