धामणगांव बढे पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदाचा सुखदेव भोरकडे यांनी पदभार स्वीकारला.

 
borkde
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):धामणगांव बढे पोलीस ठाण्याचे  ठाणेदार  चंद्रकांत ममताबादे यांची नागपुर शहरला बदली झाल्याने त्यांच्या  रिक्त झालेल्या  जागेवर मलकापूर शहर डी.बि. पथकाचे साहायक पोलीस निरीक्षक सुखदेव अवधुत भोरकडे यांना पदस्थापना देण्यात आली असून, त्यांनी पदभार स्वीकारला.

ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी  धामणगांव बढे  पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. सुखदेव भोरकडे यांनी धुळे, जळगांव खानदेशसह मलकापुर येथे त्यांनी डी.बि. पथक ची धुरा सांभाळी होती. सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या नेतृत्वात मलकापूर डी.बि.पथकाने अनेक गंभीर व किचकट गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

३१ डिसेंबर रोजी त्यांना धामणगांव बढे ठाणेदारपदी नेमणूक देण्यात आली.बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी उपरोक्त आदेश  ३१ डिसेंबर रोजी पारीत केले. धामणगांव बढे पोलीस स्टेशन हद्दित  वाढती गुन्हेगारी व  चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे आव्हान नविन ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या समोर आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे हे धामणगाव बढे पोलीस ठाण्या च्या हद्दितील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश  लावण्यासाठी  कोणती पावले पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष  लागुन आहे.