बुलडाण्याच्या पहेल इन्स्टिट्यूटचा राज्यात डंका! डायरेक्टर प्रा. निखिल श्रीवास्तव सरांना मानाचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार! कारणही तसेच; बुलडाण्यात घडवतात भविष्यातील डॉक्टर!

 
बुलडाणा( वाणिज्य प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात बुलडाण्याच्या "पहेल इन्स्टिट्यूट" ने अल्पावधीत आपला नावलौकिक निर्माण केला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना डॉक्टर,  इंजिनिअर होण्यासाठी आता प्रचंड खर्चिक असलेल्या लातूर ,अकोला, औरंगाबाद अन् कोट्याला जायची गरजच नाही. पहेल इन्स्टिट्यूटने जिल्हाभरातील गोरगरीब, शेतकरी  मध्यवर्गीय आणि सर्चव स्थरातील पालकांच्या मुलांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याच शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पहेल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. निखिल श्रीवास्तव सरांना महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणारा मानाचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आला. २१ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील एमजीएम कॅम्पसच्या आर्यभट्ट सभागृहात कोचिंग क्लासेस असोसिएशनचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन दिमाखात संपन्न झाले. या अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोचिंग क्लासेस असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. पी.एन. वाघ होते.

 बुलडाणा शहरातील चैतन्यवाडी मध्ये असलेल्या पहेल इन्स्टिट्यूट ने शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉक्टर बनायचे असेल तर कोट्याला अन लातूरला जावेच लागते, प्रचंड पैसा खर्च करावाच लागतो, हे गरिबांचे काम नाही हा भ्रम दूर करण्याचे काम "पहेल इन्स्टिट्युट" ने केले आहे.  विशेष म्हणजे आपल्या पहिल्या बॅचमधूनच निकालाच्या उज्वल अन् खऱ्याखुऱ्या बुलडाणा पॅटर्नची मुहूर्तमेढ रोवली आहे. पहिल्या बॅचच्या पायल रोकडे हिने ७२० पैकी ५६० तर वैष्णवी देशमुख हिने ७२० पैकी ५५० गुण मिळवले आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी देखील चांगली कामगिरी केली असून यापुढच्या येणाऱ्या प्रत्येक बॅचचा निकाल हा उत्तरोत्तर वाढतच जाणार असल्याचा विश्वास प्रा. निखिल श्रीवास्तव सरांना वाटतो.

प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष..!

पहेल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे प्राध्यापकांच्या वतीने व्यक्तिगत लक्ष दिल्या जाते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अपेक्षित वाढ होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी प्रती "नीट" परीक्षेचे आयोजन यंदाच्या नीट परीक्षेच्या आधी इन्स्टिट्यूट च्या वतीने करण्यात आले होते. याचा फायदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा देतांना झाला होता.  प्रत्येक विषयाची तज्ञ प्राध्यापक मंडळी विद्यार्थ्यांच्या यशासाठी झटत असतात त्यामुळे अल्पावधीत "पहेल इन्स्टिट्यूटने" आपली वेगळी ओळख निर्माण केलीय हे विशेष..!
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
9011088121
8421088121
9766924900