…म्‍हणून ८१ प्रकल्‍पग्रस्‍त शेतकरी झाले खुश!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा व सत्र न्यायालयात आज, 25 सप्टेंबरला आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 81 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तडजोडीपोटी 56 लाख 63 हजार 798 रुपयांचा मोबदला देण्यात आला. यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खडकपूर्णा प्रकल्पासह अन्य प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील या 81 शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली होती. अवार्ड 18 अंतर्गत वाढीव मोबदला …
 
…म्‍हणून ८१ प्रकल्‍पग्रस्‍त शेतकरी झाले खुश!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा व सत्र न्यायालयात आज, 25 सप्‍टेंबरला आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 81 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तडजोडीपोटी 56 लाख 63 हजार 798 रुपयांचा मोबदला देण्यात आला. यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खडकपूर्णा प्रकल्पासह अन्य प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील या 81 शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली होती. अवार्ड 18 अंतर्गत वाढीव मोबदला मिळावा यासाठी या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ही 25 प्रकरणे सामोपचाराने सोडविण्याकरिता राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यात आली. आज आयोजित विविध यंत्रणा व प्रकल्प ग्रस्त शेतकरी यांच्यात यशस्वी तडजोड करण्यात आली. यामुळे या शेतकऱ्यांना 56 लाखांपेक्षा जास्त मोबदला देण्यात आला. यावेळी न्यायाधीश श्रीमती गायकवाड, भूसंपादन अधिकारी भूषण अहिरे, खडकपूर्णा सिंचन प्रकल्पाच्या उप अभियंता काजल जाधव, संबंधित पॅनेलचे वकील, कास्तकार हजर होते.