८ पोलीस अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली; २ नवीन अधिकारी येणार
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी काल, १८ ऑगस्टला रात्री उशिरा बदल्यांचे पत्र काढले. बदली केलेल्या अधिकाऱ्यांत १६ पोलीस निरीक्षक तर २२ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ६ पोलीस निरीक्षक आणि २ सहायक पोलीस निरीक्षकांची बदली जिल्ह्याबाहेर झाली आहे.
शेगाव शहरचे ठाणेदार संतोष टाले यांची अमरावती ग्रामीण येथे बदली करण्यात आली. जळगाव जामोदचे ठाणेदार सुनील जाधव यांची वाशिम, बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार सारंग नवलकार यांची वाशिम, बोराखेडीचे ठाणेदार माधवराव गरुड यांची अमरावती ग्रामीण, खामगाव ग्रामीणचे ठाणेदार रफीक शेख यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू खारडे यांची यवतमाळ तर चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहायक पोलीस निरिक्षक मिलिंदकुमार दवणे यांची अमरावती ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. खामगावमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील हुड यांची वाशिम जिल्ह्यात बदली झाली आहे.
जिल्ह्यात २ नवीन अधिकारी
नंदकुमार दशरथ आयरे व अमोल प्रभाकर बारापात्रे हे दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक यवतमाळ जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत.