१९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; चिखली तालुक्यातील घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गळफास घेऊन १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना देऊळगाव घुबे (ता. चिखली) येथे काल, २ ऑक्टोबरला रात्री नऊच्या सुमारास घडली. भागवत केशव साखरे( रा देऊळगाव घुबे, ता. चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
भागवत हा खो खो खेळाचा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होता. भागवतचा चुलतभाऊ ऋषिकेश अरुण साखरे याचा १४ सप्टेंबर रोजी खामगाव तालुक्यातील लोखंडा फाट्याजवळील अपघातात मृत्यू झाला होता. भागवतचे आई-वडील काल रात्री जेवायला गावातीलच अरुण साखरे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी भागवत घरी एकटाच होता.
आई- वडील रात्री घरी परतल्यावर त्यांना भागवत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती अंढेरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वृत्त लिहीपर्यंत भागवतच्या आत्महत्येचे कारण समोर येऊ शकले नाही. १५ दिवसांत साखरे परिवारातील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तपास पोहेकाँ कैलास उगले हे करत आहेत