१३ मजुरांचे मृतदेह रुग्णवाहिकांतून मध्यप्रदेशकडे रवाना; पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, एसपी अरविंद चावरिया यांची दुर्घटनास्थळी भेट
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तढेगावजवळ टिप्पर उलटून मृत्यूमुखी पडलेल्या १३ मजुरांचे मृतदेह आज, २१ ऑगस्टला उत्तरीय तपासणीनंतर मध्यप्रदेशकडे रवाना करण्यात आले. १३ रुग्णवाहिकांमध्ये हे मृतदेह जालना येथून रवाना करण्यात आले आहेत. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी आज दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरियासुद्धा होते. श्री. मीना व पोलीस …
Aug 21, 2021, 17:02 IST
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तढेगावजवळ टिप्पर उलटून मृत्यूमुखी पडलेल्या १३ मजुरांचे मृतदेह आज, २१ ऑगस्टला उत्तरीय तपासणीनंतर मध्यप्रदेशकडे रवाना करण्यात आले. १३ रुग्णवाहिकांमध्ये हे मृतदेह जालना येथून रवाना करण्यात आले आहेत. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी आज दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरियासुद्धा होते. श्री. मीना व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मजुरांचे तात्पुरते निवासस्थान असलेल्या समृद्धी बेस कॅम्पला सुद्धा त्यांनी भेट दिली व स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली.