१० दिवसापांसून बेपत्ता होती; आज थेट मृतदेहच आढळला, शेगाव शहरातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५५ वर्षीय विवाहितेचा आज, ८ सप्टेंबर रोजी मृतदेह आढळला. शेगाव- वरवट रोडवरील आशा सॉ मिलजवळील एका तलावात सकाळी ११ वाजता हा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून ओळख पटविण्याचे आवाहन केले. मृतक महिलेचा मुलगा रामकृष्ण नामदेव टावरे याने हा मृतदेह आपली आई …
 
१० दिवसापांसून बेपत्ता होती; आज थेट मृतदेहच आढळला, शेगाव शहरातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५५ वर्षीय विवाहितेचा आज, ८ सप्टेंबर रोजी मृतदेह आढळला. शेगाव- वरवट रोडवरील आशा सॉ मिलजवळील एका तलावात सकाळी ११ वाजता हा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून ओळख पटविण्याचे आवाहन केले. मृतक महिलेचा मुलगा रामकृष्ण नामदेव टावरे याने हा मृतदेह आपली आई आशा नामदेव टावरे (५५, रा. धनोकारनगर, शेगाव) यांचा असल्याचे सांगितले.

धनोकारनगर परिसरात राहणारे नामदेव टावरे यांनी ३० ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात बायको बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून त्यांची पत्नी घरी कुणाला काहीही न सांगता निघून गेली होती. शोध घेऊनही न सापडल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून शहर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. मात्र आज थेट मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.