हिवरा आश्रमचा नवा सरपंच उद्या निवडणार!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प. पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमामुळे जे गाव वसले अन् विकसित झाले त्या हिवरा आश्रम गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता पंचक्रोशीत असते. सरपंच सौ. प्राजक्ता नितीन इंगळे यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यानंतर उद्या, १३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता नवीन सरपंच निवडला जाणार आहे. ग्रामपंचायतीत अकरा सदस्य असून, ठरल्याप्रमाणे सरपंच सौ. …
 
हिवरा आश्रमचा नवा सरपंच उद्या निवडणार!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प. पू. शुकदास महाराज संस्‍थापित विवेकानंद आश्रमामुळे जे गाव वसले अन्‌ विकसित झाले त्‍या हिवरा आश्रम गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीची उत्‍सुकता पंचक्रोशीत असते. सरपंच सौ. प्राजक्‍ता नितीन इंगळे यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यानंतर उद्या, १३ ऑक्‍टोबरला सकाळी ११ वाजता नवीन सरपंच निवडला जाणार आहे.

ग्रामपंचायतीत अकरा सदस्य असून, ठरल्याप्रमाणे सरपंच सौ. प्राजक्‍ता इंगळे यांनी गेल्या महिन्यात १० तारखेला राजीनामा दिला होता. उपसरपंच रमेश महाराज गिरी सध्या आहेत. हिवरा आश्रमचा सरपंच कोण हाेणार, याची उत्‍सुकता सध्या सगळीकडे आहे. खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर म्‍हणतील तोच सरपंच हाेणार असल्याचे माळ कुणाच्‍या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.