हातावर “लव्‍ह’चं चिन्‍हं असलेला मृतदेह किशोरचा!; खामगावमध्ये पटली ओळख

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ५ ऑक्टोबरला जनुना तलावात एक अनोळखी मृतदेह तरंगताना आढळला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मृतकाच्या हातावर लव्हचे चिन्ह आणि त्यात किशोर असे नाव गोंदलेले होते. त्यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. आज, ७ ऑक्टोबरला मृतकाची ओळख पटली. त्याचे नाव किशोर प्रकाश गाढे (३५, रा. जगदंबा कॉलनी, …
 
हातावर “लव्‍ह’चं चिन्‍हं असलेला मृतदेह किशोरचा!; खामगावमध्ये पटली ओळख

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ५ ऑक्टोबरला जनुना तलावात एक अनोळखी मृतदेह तरंगताना आढळला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मृतकाच्या हातावर लव्हचे चिन्ह आणि त्यात किशोर असे नाव गोंदलेले होते. त्यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. आज, ७ ऑक्टोबरला मृतकाची ओळख पटली. त्‍याचे नाव किशोर प्रकाश गाढे (३५, रा. जगदंबा कॉलनी, घाटपुरी) असल्याचे समोर आले. मात्र किशोरची आत्महत्या आहे की घातपात हे अजून समोर येऊ शकले नाही. तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.