स्‍टेअरिंग जाम झाल्याने बोलेरो पीकअप वाहन उलटले!; दोघे गंभीर

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने बोलेरो पीकअप वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. यात वाहनातील दोन युवकांना जबर मार लागला आहे. ही घटना आज, ३१ ऑगस्टच्या सकाळी सातच्या सुमारास चिखली- जालना रोडवरील अंढेरा फाट्याजवळ घडली. राहुल चाटे आणि विशाल चाटे (रा. नागपूर) अशी जखमींची नावे आहेत. दोघे नागपूरहून औरंगाबादकडे …
 
स्‍टेअरिंग जाम झाल्याने बोलेरो पीकअप वाहन उलटले!; दोघे गंभीर

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्‍टेअरिंग अचानक जाम झाल्याने बोलेरो पीकअप वाहन रस्‍त्‍याच्‍या कडेला उलटले. यात वाहनातील दोन युवकांना जबर मार लागला आहे. ही घटना आज, ३१ ऑगस्‍टच्‍या सकाळी सातच्‍या सुमारास चिखली- जालना रोडवरील अंढेरा फाट्याजवळ घडली.

राहुल चाटे आणि विशाल चाटे (रा. नागपूर) अशी जखमींची नावे आहेत. दोघे नागपूरहून औरंगाबादकडे निघाले होते. अपघातात वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती कळताच देऊगाव मही येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी विकास शिंगणे व नागेश शिंगणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. डाॅ. बोर्डे, डॉ. सोळंकी, मनोज खिल्लारे व नर्स आघाव यांनी जखमींवर प्रथमोपचार सुरू केले. नंतर गंभीर जखमी असल्याने त्यांना तात्काळ १०८ रुग्‍णवाहिकेने जालना येथे हलविण्यात आले आहे. यावेळी विकास शिंगणे यांनी आर्थिक मदत म्हणून जखमींसाठी १३०० रुपये दिले हे विशेष.