सिमेंट गोण्या घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये दडवला १० लाखांचा गांजा!; ३ महिलांसह ६ जणांना अटक, बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेची चिखलीत कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्यांविरुद्ध बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) विशेष मोहीम हाती घेतली आहेत. गेल्या काही दिवसांत गांजा तस्करांच्या कारवाया वाढल्याने गांजा जिल्ह्यात येतो कुठून, याचा शोध घेण्याचे आदेश कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी “एलसीबी’ला दिले होते. यासाठी पथकाचीही नियुक्ती केली आहे. या पथकाने एका ट्रकची …
 
सिमेंट गोण्या घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये दडवला १० लाखांचा गांजा!; ३ महिलांसह ६ जणांना अटक, बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेची चिखलीत कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्यांविरुद्ध बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) विशेष मोहीम हाती घेतली आहेत. गेल्या काही दिवसांत गांजा तस्करांच्या कारवाया वाढल्याने गांजा जिल्ह्यात येतो कुठून, याचा शोध घेण्याचे आदेश कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी “एलसीबी’ला दिले होते. यासाठी पथकाचीही नियुक्‍ती केली आहे. या पथकाने एका ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये ८१ किलो गांजा मिळून आला. गांजा तस्करी करणाऱ्या ३ महिलांसह ६ जणांना अटक करण्यात आली. काल, १४ सप्टेंबर रोजी चिखली येथील खामगाव चौफुलीजवळील पंचमुखी महादेव मंदिराजवळ दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

जालना येथून एक ट्रक खामगाव येथे जात असून, त्यात गांजा असल्याची गोपनीय माहिती “एलसीबी’ला मिळाली होती. त्यानुसार पथकाने चिखली शहरातील खामगाव चौफुलीजवळ सापळा रचला. संशयित ट्रकची तपासणी केली असता त्‍यात सिमेंटच्या गोण्या होत्या. मात्र आतमध्ये गांजा दडवलेला होता. पथकाने गांजा जप्त करून वजन केले असता ८१.१७२ किलो भरला. ज्याची किंमत १० लाख ४५ हजार ४४० रुपये आहे. यासोबतच गांजा वाहतूक करणारा ट्रक (किंमत १० लाख रुपये) व एक मोबाइल फोन (किंमत १ हजार) असा एकूण २० लाख ५१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आरोपींपैकी एक जण अल्पवयीन आहे. राजू रामराव पवार (२०), सपना राजू पवार (१९, दोघे रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद, सुषमा रोहिदास मोहिते (४०), यमुना अप्पा चव्हाण (३०, दोघी रा. कॉटन मार्केटजवळ मोताळा) व ट्रकचालक सुरेश बाबूलाल (४२, रा. भवानी मंडी, झलवार राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. एक आरोपी अल्पवयीन आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने “एलसीबी’चे सहायक पोलीस निरिक्षक अमित वानखेडे, सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, प्रकाश राठोड, दशरथ जुमडे, गणेश पाटील, विजय सोनोने, जयंत बोचे, संभाजी असोलकर, दीपक वायाळ, मधुकर रगड व चिखली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक अमोल बारापात्रे, सायबर सेलचे राजू आढवे यांनी पार पाडली.