सर्पदंशाने विवाहितेचा मृत्यू; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विषारी सापाने चावा घेतल्याने २५ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान आज, १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. सुचित्रा सुरेश गावंडे (रा. वाघोळा, ता. मलकापूर) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सुचित्रा यांना १२ सप्टेंबर रोजी घरकाम करत असताना विषारी सापाने चावा घेतला होता. त्यांना उपचारासाठी मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान …
 
सर्पदंशाने विवाहितेचा मृत्यू; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विषारी सापाने चावा घेतल्याने २५ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान आज, १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. सुचित्रा सुरेश गावंडे (रा. वाघोळा, ता. मलकापूर) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सुचित्रा यांना १२ सप्टेंबर रोजी घरकाम करत असताना विषारी सापाने चावा घेतला होता. त्यांना उपचारासाठी मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज, १५ सप्टेंबर रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.