शौचालयाच्या दरवाजामागे लपला होता, मुलगी येताच धरला हात!; खामगाव शहरातील घटना
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शौचालयाच्या दरवाजागे लपून तरुणाने मुलगी येताच तिचा हात धरून विनयभंग केला. ही घटना २४ ऑगस्टला रात्री उशिरा खामगाव शहरातील रेखा प्लॉट भागात घडली. १६ वर्षीय मुलगी घराच्या अंगणात असलेल्या शौचालयात लघुशंकेसाठी गेली होती. त्यावेळी तुषार यादव (रा. रेखा प्लॉट) हा शौचालयाच्या दरवाजामागे लपला होता. त्याने तिचा हात वाईट उद्देशाने हात …
Aug 25, 2021, 16:13 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शौचालयाच्या दरवाजागे लपून तरुणाने मुलगी येताच तिचा हात धरून विनयभंग केला. ही घटना २४ ऑगस्टला रात्री उशिरा खामगाव शहरातील रेखा प्लॉट भागात घडली. १६ वर्षीय मुलगी घराच्या अंगणात असलेल्या शौचालयात लघुशंकेसाठी गेली होती. त्यावेळी तुषार यादव (रा. रेखा प्लॉट) हा शौचालयाच्या दरवाजामागे लपला होता. त्याने तिचा हात वाईट उद्देशाने हात धरला. मुलीने आरडाओरड केली असता त्याने जिवे मारण्याची धमकी दिली व पळून गेला, अशी तक्रार मुलीने दिली आहे. पोलिसांनी तुषारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.