विद्युत खांबावर काम करताना हेल्परला शॉक; खांबावरून कोसळून मृत्‍यू; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विद्युत खांबावर काम करताना २६ सप्टेंबरला दुपारी सव्वाच्या सुमारास शॉक लागून ४५ वर्षीय हेल्पर व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. घाटपुरी भागात ही घटना घडली होती. काल, २ ऑक्टोबर रात्री ८ वाजता सिल्व्हर सिटी हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून शिवाजीनगर पोलिसांनी नोंद घेतली आहे. गजानन रमेश …
 
विद्युत खांबावर काम करताना हेल्परला शॉक; खांबावरून कोसळून मृत्‍यू; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विद्युत खांबावर काम करताना २६ सप्‍टेंबरला दुपारी सव्वाच्‍या सुमारास शॉक लागून ४५ वर्षीय हेल्पर व्‍यक्‍ती गंभीर जखमी झाला होता. घाटपुरी भागात ही घटना घडली होती. काल, २ ऑक्‍टोबर रात्री ८ वाजता सिल्व्हर सिटी हॉस्पिटलमध्ये त्‍याचा मृत्‍यू झाला. डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीवरून शिवाजीनगर पोलिसांनी नोंद घेतली आहे. गजानन रमेश टाले (४५, रा. घाटपुरी, खामगाव) असे मृतकाचे नाव आहे. घाटपुरी आवारात विद्युत खांबावर काम करत असताना त्‍याला शॉक लागला. तो खांबावरून पडला. यात त्‍याला दुखापत झाली. प्रकृती गंभीर असल्याने त्‍याच्‍या नातेवाइकांनी त्‍याला खामगाव शहरातील सिल्व्हर सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला. तपास नापोकाँ प्रदीप मोठे करत आहेत.