वर्धापन दिनी ‘बुलडाणा लाइव्‍ह’तर्फे गोशाळेत ढेपदान; बुलडाणा व्‍हिजनचे प्रकाशन अन्‌ सन्‍मान पुरस्‍कारांचे वितरण ‘कडक लॉकडाऊन’मुळे पुढे ढकलले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या वर्षी अक्षयतृतीयेला बुलडाणा लाइव्ह या जिल्ह्यातील पहिल्या लोकल न्यूज वेबसाईटची सुरुवात झाली होती. लाइव्ह ग्रुप संचालित या वेबसाईटने अल्पावधीत बुलडाणेकरांची मने जिंकली. काहीशे वाचकांपासून सुरू झालेला हा प्रवास सध्या सव्वा लाख वाचकांपर्यंत आला आहे. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बुलडाणा लाइव्हने आपल्या परंपरेला साजेशी कामगिरी केली. व्हिजन बुलडाणा विशेषांकाचे प्रकाशन आणि …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या वर्षी अक्षयतृतीयेला बुलडाणा लाइव्‍ह या जिल्ह्यातील पहिल्या लोकल न्‍यूज वेबसाईटची सुरुवात झाली होती. लाइव्‍ह ग्रुप संचालित या वेबसाईटने अल्पावधीत बुलडाणेकरांची मने जिंकली. काहीशे वाचकांपासून सुरू झालेला हा प्रवास सध्या सव्वा लाख वाचकांपर्यंत आला आहे. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बुलडाणा लाइव्‍हने आपल्या परंपरेला साजेशी कामगिरी केली. व्हिजन बुलडाणा विशेषांकाचे प्रकाशन आणि बुलडाणा लाइव्‍ह सन्‍मान पुरस्‍कार वितरण कडक लॉकडाऊनमुळे पुढे ढकलले असले तरी आज, 14 मे रोजी आगळावेगळा पायंडा पाडत बुलडाणा लाइव्‍हतर्फे बुलडाणा अर्बनच्‍या चिखली रोडवरील गोरक्षा धामात जाऊन ढेपदान केली. लाइव्‍ह ग्रुपचे समूह सल्लागार तथा बुलडाणा लाइव्‍हचे संचालक मनोज सांगळे यांची ही संकल्पना होती. यावेळी संपादक संजय मोहिते, जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ, व्‍यवस्‍थापक अजय राजगुरे, आकाश पाडळे यांची उपस्‍थिती होती. गोशोळेची व्‍यवस्‍था पाहणारे रामदास गव्‍हाणे आणि नितीन वायाळ यांनी ढेप स्‍वीकारली.

वर्धापन दिनी ‘बुलडाणा लाइव्‍ह’तर्फे गोशाळेत ढेपदान; बुलडाणा व्‍हिजनचे प्रकाशन अन्‌ सन्‍मान पुरस्‍कारांचे वितरण ‘कडक लॉकडाऊन’मुळे पुढे ढकलले!