लोणारनजीक एसटी बस वाहून गेल्याच्या “व्हायरल’ने हादरला जिल्हा! एसटी विभागाची तारांबळ!! मात्र अखेर ठरली अफवा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गत् 24 तासांपासून मुसळधार पाऊस जिल्ह्याला झोडपत असताना लोणारनजीक एसटी बस पुरात वाहून गेल्याच्या भीषण अफवेने आज, २८ सप्टेंबरला सकाळी काही तास प्रशासकीय यंत्रणेसह प्रसिद्धी माध्यमे, जिल्हावासी हादरल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र हे वृत्त आणि त्सुनामीच्या वेगाने व्हायरल झालेला तो व्हिडिओ जिल्ह्यापुरता तरी अफवा असल्याचे पण यवतमाळ …
 
लोणारनजीक एसटी बस वाहून गेल्याच्या “व्हायरल’ने हादरला जिल्हा! एसटी विभागाची तारांबळ!! मात्र अखेर ठरली अफवा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गत्‌ 24 तासांपासून मुसळधार पाऊस जिल्ह्याला झोडपत असताना लोणारनजीक एसटी बस पुरात वाहून गेल्याच्‍या भीषण अफवेने आज, २८ सप्‍टेंबरला सकाळी काही तास प्रशासकीय यंत्रणेसह प्रसिद्धी माध्यमे, जिल्हावासी हादरल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र हे वृत्त आणि त्सुनामीच्या वेगाने व्हायरल झालेला तो व्हिडिओ जिल्ह्यापुरता तरी अफवा असल्याचे पण यवतमाळ जिल्ह्यातील सत्य घटना असल्याचे निष्पन्न झाले.

सोशल मीडिया काय धुमाकूळ घालू शकतो याचा प्रत्यय या भीषण दृश्याने आला! मुसळधार पाऊस अन्‌ पूर एन्जॉय करणारे युवक थांब थांब म्हणत असतानाही हिरकणी पुढे नेणारा एसटी चालक, हळूहळू पुढे सरकत अलगद पुरात बुडणारी बस हे सर्व दृश्य जीवाचा थरकाप उडविणारी ठरली. त्यातच जिल्ह्यातील दुर्घटना म्हटल्यावर जिल्ह्यात गहजब उडाला! मात्र बुलडाणा जिल्ह्याच्‍या सुदैवाने ती अफवा पण यवतमाळ जिल्ह्यासाठी दुर्दैवी बाब ठरली, कारण ती दुर्घटना तिकडे घडली.

जिल्ह्यात प्रशासनाने घेतला धसका
यवतमाळच्‍या घटनेचा जिल्ह्यातील यंत्रणेला मोठा इफेक्‍ट झाल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने पोलीस यंत्रेणला पूर आलेल्या पुलाच्‍या ठिकाणी तैनातीचे आदेश दिले असून, अशा धोकादायक स्‍थितीत कोणतेही वाहन पुलावरून जाणार नाही, यासाठी दक्षता घेण्यास सांगितले आहे.