लायन्स क्‍लबच्‍या अध्यक्षपदावरून अभिषेक अग्रवालची हकालपट्टी!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ९ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात खामगाव लायन्स क्लबचा अध्यक्ष अभिषेक अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्याची लायन्स क्लब अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव लायन्स क्लबच्या सभेत घेण्यात आला. आदर्शनगर येथील बालिकेचा अग्रवालने विनयभंग केल्याचा आरोप आहे. अग्रवाल हा १ जुलै २०२१ पासून लायन्स क्लबचा अध्यक्ष होता. या प्रकरणाचा निकाल …
 
लायन्स क्‍लबच्‍या अध्यक्षपदावरून अभिषेक अग्रवालची हकालपट्टी!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ९ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्‍या प्रकरणात खामगाव लायन्स क्लबचा अध्यक्ष अभिषेक अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्‍यामुळे त्‍याची लायन्स क्लब अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव लायन्स क्लबच्‍या सभेत घेण्यात आला. आदर्शनगर येथील बालिकेचा अग्रवालने विनयभंग केल्‍याचा आरोप आहे. अग्रवाल हा १ जुलै २०२१ पासून लायन्स क्लबचा अध्यक्ष होता. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत सदस्यत्वसुद्धा काढून घेण्यात आले आहे. सध्या अध्यक्षपदाची धुरा उपाध्यक्ष महेश चांडक यांच्‍यावर सोपविण्यात आली आहे.