लांडग्याच्या हल्ल्यात ७ बकऱ्या ठार; बुलडाणा तालुक्यातील घटना
बुलडाणा : लांडग्याच्या हल्ल्यात ७ बकऱ्या ठार झाल्याची घटना आज, २१ ऑगस्ट रोजी चांडोळ (ता. बुलडाणा) येथे समोर आली. शेतकरी विठ्ठलसिंग कुंठबरे यांचे चांडोळ शिवारात दोन एकर शेत आहे. त्यांनी जोड धंदा म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. शेतातील गोठ्यात ८ बकऱ्या बांधलेल्या होत्या. २० ऑगस्टच्या रात्री लांडग्यांनी बकऱ्यांवर हल्ला करून ७ बकऱ्या ठार …
Aug 21, 2021, 21:37 IST
बुलडाणा : लांडग्याच्या हल्ल्यात ७ बकऱ्या ठार झाल्याची घटना आज, २१ ऑगस्ट रोजी चांडोळ (ता. बुलडाणा) येथे समोर आली. शेतकरी विठ्ठलसिंग कुंठबरे यांचे चांडोळ शिवारात दोन एकर शेत आहे. त्यांनी जोड धंदा म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. शेतातील गोठ्यात ८ बकऱ्या बांधलेल्या होत्या. २० ऑगस्टच्या रात्री लांडग्यांनी बकऱ्यांवर हल्ला करून ७ बकऱ्या ठार केल्या. एक बकरी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा वन विभागाचे वनपाल एस. ए. अंबेकर, वनरक्षक एस. डी. वानखेडे, ए. बी. हिवाळे, एस. डी. भिंगारे, तलाठी आर. बी. चव्हाण, कोतवाल सुरेश जाधव यांनी घटनास्थळी पोहाेचून पंचनामा केला आहे. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी विठ्ठल कुंठबरे यांनी केली आहे.