लई हुशारी केली पण कामी नाही आली… भाजीपाल्याच्या गाडीत चक्क ८ लाखांचा गुटखा; एकाला अटक, मलकापूर तालुक्‍यातील कारवाई

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजीपाल्याच्या कॅरेट्सच्या आड लाखो रुपयांचा गुटखा घेऊन बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या ४०७ वाहनाला मलकापूर ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अडवले. या वाहनात तब्बल ८ लाख रुपयांचा गुटखा लपवलेला होता. वाहनासह एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी वाहनचालक शेख नदीम शेख मुल्तकीम (२८, रा. सैलानीनगर, चिखली) याला अटक केली आहे. ही कारवाई …
 
लई हुशारी केली पण कामी नाही आली… भाजीपाल्याच्या गाडीत चक्क ८ लाखांचा गुटखा; एकाला अटक, मलकापूर तालुक्‍यातील कारवाई

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजीपाल्याच्या कॅरेट्सच्या आड लाखो रुपयांचा गुटखा घेऊन बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या ४०७ वाहनाला मलकापूर ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अडवले. या वाहनात तब्‍बल ८ लाख रुपयांचा गुटखा लपवलेला होता. वाहनासह एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी वाहनचालक शेख नदीम शेख मुल्तकीम (२८, रा. सैलानीनगर, चिखली) याला अटक केली आहे. ही कारवाई काल, १६ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मलकापूर- बुलडाणा रोडवरील दाताळा शिवारातील घिर्णी फाट्यावर करण्यात आली.

४०७ वाहनातून (क्र. एमएच २८ एबी ५८५९) अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्‍यामुळे पोलिसांनी नाकेबंदी केली. संशयित वाहन दिसताच त्‍याला थांबविण्यात आले. या वाहनात प्रिमीयम राज निवास सुगंधित पान मसाला, जाफरानी जर्दाचा माल १९ पांढऱ्या पोतड्यांत भरलेला होता. याची किंमत ८ लाख १८ हजार ६४० रुपये व आहे. ४०७ वाहनाची किंमत ६ लाख, एक मोबाइल १० हजार रुपयांचा असा एकूण एकूण १४ लाख २८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍या मार्गदर्शनाखाली मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार एफ. सी. मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तायडे, नापोकाँ रघुनाथ जाधव, नापोकाँ राजेश बावणे, पोहेकाँ उल्हास मुके, संदीप राखोंडे, चंद्रशेखर गायकवाड यांनी केली.