रेल्‍वेखाली येऊन ५० वर्षीय व्यक्‍तीचा मृत्‍यू, शेगावमधील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेल्वेखाली येऊन ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना काल, २८ ऑगस्टच्या सकाळी साडेआठच्या सुमारास शेगावात समोर आली. या प्रकरणी रेल्वेस्टेशन प्रबंधक विक्रम बनसोड यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद मृतदेहाची ओळख पटवणे सुरू केले आहे. रेल्वे लाइनवरील खांब क्रमांक केएम ५४९ जवळ हा अपघात घडला …
 
रेल्‍वेखाली येऊन ५० वर्षीय व्यक्‍तीचा मृत्‍यू, शेगावमधील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेल्‍वेखाली येऊन ५० वर्षीय व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाल्याची घटना काल, २८ ऑगस्‍टच्‍या सकाळी साडेआठच्‍या सुमारास शेगावात समोर आली. या प्रकरणी रेल्‍वेस्‍टेशन प्रबंधक विक्रम बनसोड यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद मृतदेहाची ओळख पटवणे सुरू केले आहे. रेल्‍वे लाइनवरील खांब क्रमांक केएम ५४९ जवळ हा अपघात घडला आहे. तपास पोहेकाँ विजय टेकाळे करत आहेत. ट्रॅकमन राम अवतार मीना (४९, रा. रेल्वे क्‍वार्टर शेगाव) यांनी स्टेशन प्रबंधक विक्रम बनसोड यांच्‍याकडे ही माहिती दिली. त्‍यानंतर बनसोड यांनी पोलिसांना कळवले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.