रात्रीतून तीन ATM फोडून चोरट्यांनी ५६ लाख लांबवले होते… त्‍यांना पकडणे अवघड होते, पण जिल्हा पोलीस दलाने अवघ्या १२ दिवसांत मुसक्‍या आवळल्‍या!; वाचा कसे पकडलेत हे “महाचोर’!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील शेलूद, उंद्री आणि खामगाव तालुक्यातील पळशी येथील “एसबीआय’चे एटीएम फोडून ५६ लाख रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना ३० जुलैला सकाळी समोर आली होती. गॅस कटरच्या साह्याने चोरट्यांनी एटीएम फोडले होते. या चोऱ्यांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यादृष्टीने कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या प्रकरणात विशेष …
 
रात्रीतून तीन ATM फोडून चोरट्यांनी ५६ लाख लांबवले होते… त्‍यांना पकडणे अवघड होते, पण जिल्हा पोलीस दलाने अवघ्या १२ दिवसांत मुसक्‍या आवळल्‍या!; वाचा कसे पकडलेत हे “महाचोर’!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील शेलूद, उंद्री आणि खामगाव तालुक्यातील पळशी येथील “एसबीआय’चे एटीएम फोडून ५६ लाख रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना ३० जुलैला सकाळी समोर आली होती. गॅस कटरच्या साह्याने चोरट्यांनी एटीएम फोडले होते. या चोऱ्यांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यादृष्टीने कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून तपासकामी ५ पथके तयार करून परराज्यात पाठवली होती. या पथकांनी कामगिरी फत्ते केली. अवघ्या १२ दिवसांत २ चोरट्यांना गजाआड केले असून, त्यांच्याकडून १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. श्री. चावरिया यांनी आज, १४ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांना ही माहिती दिली.

रात्रीतून तीन ATM फोडून चोरट्यांनी ५६ लाख लांबवले होते… त्‍यांना पकडणे अवघड होते, पण जिल्हा पोलीस दलाने अवघ्या १२ दिवसांत मुसक्‍या आवळल्‍या!; वाचा कसे पकडलेत हे “महाचोर’!!

२५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले
एटीएम फोडीची घटना घडल्यानंतर स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तांत्रिक बाबी तपासण्यासाठी सायबर सेलला निर्देश देण्यात आले होते. तपासकामी तयार केलेल्या पथकांनी चिखली, शेलूद, उंद्री, लाखनवाडा ते बाळापूर, खामगाव ते अमरावती, शेगाव ते बऱ्हाणपूर या मार्गांवरील जवळपास २५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्‍यातून आरोपींचा मार्ग समोर आला, अशी माहिती सायबर सेलचे सहायक पोलीस निरिक्षक विलासकुमार सानप यांनी पथकाला दिली. त्यानंतर अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वातील एक पथक राजस्थान येथे रवाना झाले. या पथकात एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके व श्रीकांत जिंदमवार यांच्यासह सात पोलीस कर्मचारी होते. या पथकाने राजस्थानमध्ये सात दिवस तळ ठोकून या गुन्ह्यातील दोन आरोपींना अलवर जिल्ह्यातून पकडले. पकडण्यात आलेला एक आरोपी हा राजस्थान तर दुसरा आसाम राज्यातील असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. चावरिया यांनी दिली. चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेली आलिशान कार ताब्यात घेण्यात आली. एटीएम फोडून चोरट्यांनी त्यातील रक्कम ६ बँक खात्यांत ट्रान्सफर केली होती. ती खातीसुद्धा सील करण्यात आली आहेत.

६ आरोपी निष्पन्न

या प्रकरणात एकूण ६ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यातील दोघांना पकडण्यात आले आहे. तपासाच्या कारणास्तव सध्या आरोपींची नावे जाहीर करणार नसल्याचे एसपी श्री. चावरिया म्हणाले. या प्रकरणात जिल्ह्यातील एका व्यक्तीने चोरट्यांना मदत केली असल्याचा सुगावा लागला असून, पोलीस त्याचाही शोध घेत असल्याची माहिती एसपींनी दिली. या घटनेनंतर एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विविध बँक प्रशासनाची बैठक घेऊन सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली होती. यशस्वीरीत्या कामगिरी करणाऱ्या पार पडणाऱ्या अधिकाऱ्यांचे व पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी (बुलडाणा रमेश बरकते), उपविभागीय पोलीस अधिकारी (खामगाव) अमोल कोळी, “एलसीबी’चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक नागेशकुमार चतरकर, सहायक पोलीस निरिक्षक विलासकुमार सानप, सहायक पोलीस निरिक्षक मनीष गावंडे, सहायक पोलीस निरिक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार गजानन आहेर, शरद गिरी, पंकज मेहर, विजय सोनोने, गजानन गोरले, विजय वारुळे, शत्रुघ्न शिंदे, राजू आडवे, कैलास ठोंबरे, उषा वाघ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

२१ ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडी
दोन्‍ही आरोपींना चिखली न्यायालयात हजर केले असता २१ ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्‍यांच्‍याकडून ३० हजार रुपये रोख, १५ लाखांची महिंद्रा एक्‍सयुव्‍ही कार, एलपीजी गॅस सिलिंडर (किंमत १ हजार), दोन्‍ही ऑक्सिजन सिलिंडर (किंमत १० हजार), सहा मोबाइल (किंमत ३५ हजार रुपये) असा एकूण १५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. तपास अमडापूरचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर करत आहेत.