युवकाने स्वतःला रेल्वेखाली झोकून दिले!; मलकापुरातील धक्कादायक घटना
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेल्वेखाली स्वतःला झोकून देत ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना काल, ७ ऑगस्टला पहाटे पावणेतीनच्या सुमारास मलकापूर शहरातील शिवाजीनगर भागात घडली. सुनील काशिनाथ गणतिरे (रा. शिवाजीनगर, मलकापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून, ऑटोरिक्षाही तो चालवत होता. काल पहाटे भाजीपाला खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून …
Aug 8, 2021, 17:42 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेल्वेखाली स्वतःला झोकून देत ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना काल, ७ ऑगस्टला पहाटे पावणेतीनच्या सुमारास मलकापूर शहरातील शिवाजीनगर भागात घडली.
सुनील काशिनाथ गणतिरे (रा. शिवाजीनगर, मलकापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून, ऑटोरिक्षाही तो चालवत होता. काल पहाटे भाजीपाला खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला. जवळच असलेल्या रेल्वेच्या पुलाजवळ मोटारसायकल उभी करून त्याने पावणेतीनच्या सुमारास मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसखाली स्वतःला झोकून दिले. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण आज दुसऱ्या दिवशीही समोर आलेले नाही.