मोबाइलवर बोलत असताना तू कुणासोबत बोलते म्‍हणून पतीची मारहाण!

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आत्यासोबत मोबाइलवर बोलत असताना आधी सासूने आणि नंतर पतीने आक्षेप घेत १९ वर्षीय विवाहितेला बेदम मारहाण केली. तिचा मोबाइलही फोडून टाकला. ही घटना ४ ऑगस्टला रात्री घडली. तिने बाेराखेडी पोलीस ठाण्यात आत्यासह येऊन पती व सासूविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ.पल्लवी विकास मेंहगे (रा. बेलुरा ता. नांदुरा) …
 
मोबाइलवर बोलत असताना तू कुणासोबत बोलते म्‍हणून पतीची मारहाण!

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आत्‍यासोबत मोबाइलवर बोलत असताना आधी सासूने आणि नंतर पतीने आक्षेप घेत १९ वर्षीय विवाहितेला बेदम मारहाण केली. तिचा मोबाइलही फोडून टाकला. ही घटना ४ ऑगस्‍टला रात्री घडली. तिने बाेराखेडी पोलीस ठाण्यात आत्‍यासह येऊन पती व सासूविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

सौ.पल्लवी विकास मेंहगे (रा. बेलुरा ता. नांदुरा) हिने तक्रार दिली, की तिचे लग्न मागील वर्षी मे महिन्‍यात विकास प्रकाश मेंहगे (रा. बेलुरा ता.नांदुरा) याच्‍यासोबत रितीरिवाजाप्रमाणे झाले. तिचे माहेर चापोरा (ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) येथील आहे. तिचे पती विकास मेंहगे हे दारू पिण्याच्‍या सवयीचे आहे. ते नेहमी दारू पिऊन मारझोड करतात. ४ ऑगस्‍टच्‍या रात्री आठला ती आत्यासोबत फोनवर बोलत होती. तेव्हा सासू सविता प्रकाश मेंहगे तिला म्हणाली की, तू जास्त बोलते व शिविगाळ करू लागली.

त्‍याचवेळी तिचा नवरा दारू पिऊन घरी आला व “तू कोणासोबत बोलते’ असे म्हणून दोन्ही गालात चापटा मारल्या. त्यामुळे विवाहितेच्‍या नाकातून रक्त येऊ लागले. काठी घेऊन तिला मारहाण करायला सुरुवात केली. तुला आता मारून टाकतो, असे म्‍हणत मारहाण सुरू असतानाच घराजवळील रुपाली ज्ञानेश्वर मेंहगे हिने तिला वाचवले. आई-वडिलांना फोन करून सांगत असतानाच नवऱ्याने तिचा मोबाइलही फोडून टाकला. त्यानंतर तिच्‍या आत्याने बेलुरा येथे येऊन तिला घेऊन आली, असे तक्रारीत म्‍हटले आहे.