मोटारसायकली चोरायच्या अन्‌ कमी किंमतीत विकायच्या…दोघांनी मांडला धंदा; LCB ने मुसक्‍या आवळून जप्‍त केल्या २१ मोटारसायकली, १ ट्रॅक्‍टर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी व दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) सोपविली होती. “एलसीबी’चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांनी या कामासाठी विशेष पथक नेमले. पथकाने त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला असून, दुचाकी चोरून त्या कमी किंमतीत विकणाऱ्या …
 
मोटारसायकली चोरायच्या अन्‌ कमी किंमतीत विकायच्या…दोघांनी मांडला धंदा; LCB ने मुसक्‍या आवळून जप्‍त केल्या २१ मोटारसायकली, १ ट्रॅक्‍टर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी व दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेकडे (एलसीबी) सोपविली होती. “एलसीबी’चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांनी या कामासाठी विशेष पथक नेमले. पथकाने त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला असून, दुचाकी चोरून त्या कमी किंमतीत विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथून दोन दुचाकी चोरांच्‍या मुसक्या आवळून त्यांच्याकडून १६ लाख रुपये किंमतीच्या २१ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. काल, ७ सप्टेंबर रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

सुनिल भावसिंह मुजाल्दा आणि राकेश गुलसिंग जामरा (दोघेही रा. वसाडी, ता. संग्रामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही कमी किंमतीत दुचाकी विक्री करतात, अशी माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे वसाडी येथून दोघांना त्याब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता ते मध्यप्रदेशातील दोघांच्या मदतीने मोटारसायकल चोरून कमिशनवर वसाडी, निमखेडी, टुनकी व सोनाळा येथील लोकांना विकत असल्याचे समोर आले. चोरीच्या २१ मोटारसायकली व १ ट्रॅक्टर त्यांच्याकडून जप्त करून सोनाळा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या मोटारसायकल त्यांनी बीड, नंदूरबार, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून चोरल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची श्यक्यता आहे. सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे व पोलीस कर्मचाऱ्यांनी एलसीबी पथकाला सहकार्य केले. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागवे, दिनेश बकाले, गणेश पाटील, गजानन गोरले, सुरेश भिसे, सचिन जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार राजू आढवे यांनी पार पाडली.

“एलसीबी’ने केले नागरिकांना आवाहन
कोणताही व्‍यक्‍ती विना कागदपत्राची मोटारसायकल, चारचाकी वाहन, मोबाइल विकत असेल किंवा विक्री करत असेल तर याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला द्यावी. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२७३८ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही एलसीबीने कळविले आहे.