मेहकर तालुक्‍यातून आणखी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण!; दहावीत शिकत होती

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सकाळी तिच्या भाऊजीने तिला शाळेत सोडले. संध्याकाळी ५ वाजता तिला घ्यायला ते पुन्हा शाळेत गेले. सर्व मुली वर्गातून बाहेर आल्या मात्र ती आलीच नाही. वर्गात, शाळेच्या खोल्यांमध्ये, मैत्रिणीकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या अपहरणाची तक्रार तिच्या आईने दिली. माळेगाव (ता. मेहकर) येथील १० व्या वर्गातील मुलीच्या अपहरण प्रकरणी जानेफळ …
 
मेहकर तालुक्‍यातून आणखी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण!; दहावीत शिकत होती

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सकाळी तिच्या भाऊजीने तिला शाळेत सोडले. संध्याकाळी ५ वाजता तिला घ्यायला ते पुन्हा शाळेत गेले. सर्व मुली वर्गातून बाहेर आल्या मात्र ती आलीच नाही. वर्गात, शाळेच्या खोल्यांमध्ये, मैत्रिणीकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या अपहरणाची तक्रार तिच्या आईने दिली. माळेगाव (ता. मेहकर) येथील १० व्या वर्गातील मुलीच्या अपहरण प्रकरणी जानेफळ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

माळेगाव येथील १५ वर्षीय मुलगी जानेफळच्या श्री शिवाजी हायस्‍कूलमध्ये १० वीत शिकते. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तिच्या भाऊजीने तिला शाळेत आणून सोडले. शाळा सुटण्याच्या वेळी तिचे भाऊजी पुन्हा तिला घ्यायला गेले. मात्र ती शाळेतून बाहेरच आली नाही. बराच शोध घेऊनही ती मिळून आली नाही. ही बाब नातेवाइकांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी सुद्धा सगळीकडे शोध घेतला. अखेर तिच्या आईने काल ३० ऑगस्ट रोजी अपहरणाची तक्रार दिली आहे.