महिलांनो सावधान… बाजारात जाताय? चोरट्यांची आहे बरं तुमच्यावर नजर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील आठवडे बाजाराच्या दिवशी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व दागिने हिसकावण्याच्या घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी लॉकडाऊन व बाजार बंद असल्याने महिला घराबाहेर पडत नव्हत्या. त्यामुळे अशा घटनांमध्ये घट झाली होती. बुलडाण्यातील आठवडे बाजार, बस स्टँड परिसर, चिखली रोड परिसरात चैन व मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटनांची नोंद …
 
महिलांनो सावधान… बाजारात जाताय? चोरट्यांची आहे बरं तुमच्यावर नजर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील आठवडे बाजाराच्या दिवशी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व दागिने हिसकावण्याच्या घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी लॉकडाऊन व बाजार बंद असल्याने महिला घराबाहेर पडत नव्हत्या. त्यामुळे अशा घटनांमध्ये घट झाली होती. बुलडाण्यातील आठवडे बाजार, बस स्टँड परिसर, चिखली रोड परिसरात चैन व मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटनांची नोंद शहर पोलीस ठाण्यात आहे. खामगाव शहरातील नांदुरा रोड, आठवडी बाजार, सरकी लाईन या भागात सुद्धा अलीकडच्या काळात अशा घटना घडल्या आहेत.

जिल्ह्यात २०१९ मध्ये सोनसाखळी व मंगळसूत्र गळ्यातून हिसकावल्याच्या २० तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. २०२० या वर्षात बाजार बंद व लॉकडाऊन असल्याने अशा घटनांचे प्रमाण कमी झाले होते. २०२० मध्ये चेन स्नॅचिंगच्या १० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावर्षी ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत चैन स्नॅचिंगच्या १६ घटना समोर आल्या आहेत. निनावी क्रमाकांच्या दुचाकीवरून चोरटे येतात व महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून सुसाट पळ काढतात. चोरट्यांनी तोंडावर मास्क लावलेला असतो. त्यामुळे सीसीटीव्हीचाही उपयोग होत नाही. त्यामुळे चोरट्यांचा शोध लावणे पोलिसांना कठीण होते. त्यामुळे महिलांनी बाजारात जातांना दागिने सोबत नेऊ नये, असे आवाहन पोलिसांना करावे लागते.