भाजप नगरसेवकपुत्राकडे आढळली तलवार!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील भाजपाच्या नगरसेवक पुत्राकडे लोखंडी पात्याची धारदार तलवार आढळली आहे. घाटपुरी नाका येथील त्याच्या घरातून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ही तलवार तप्त केली. ही कारवाई आज, २९ ऑगस्टला करण्यात आली. अनमोल ओमप्रकाश शर्मा असे आरोपीचे नाव असून, हजार रुपयांची तलवार त्याच्याकडे आढळली. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक …
 
भाजप नगरसेवकपुत्राकडे आढळली तलवार!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील भाजपाच्‍या नगरसेवक पुत्राकडे लोखंडी पात्‍याची धारदार तलवार आढळली आहे. घाटपुरी नाका येथील त्‍याच्‍या घरातून बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने छापा मारून ही तलवार तप्‍त केली. ही कारवाई आज, २९ ऑगस्‍टला करण्यात आली.

अनमोल ओमप्रकाश शर्मा असे आरोपीचे नाव असून, हजार रुपयांची तलवार त्‍याच्‍याकडे आढळली. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्‍या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, साहेबराव राठोड, दशरथ जुमडे, श्रीकृष्ण चांदूरकर, गजानन आहेर, विजय सोनोने, सरिता वाकोडे, सुधाकर बर्डे यांच्‍या पथकाने केली.