भलामोठा कोयता घेऊन फिरत होता गावात…; मग पोलिसांनी असा शिकवला धडा!, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हातात कोयता घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना काल, ६ ऑक्टोबरला मध्यरात्री बाराच्या सुमारास भंडारी (ता. खामगाव) येथे घडली. जितेंद्र मुळे (३५, रा. भंडारी, ता. खामगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जितेंद्र हातात भलामोठा कोयता घेऊन गावभर हिंडत होता. दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा त्याचा उद्देश असल्याने …
 
भलामोठा कोयता घेऊन फिरत होता गावात…; मग पोलिसांनी असा शिकवला धडा!, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हातात कोयता घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना काल, ६ ऑक्टोबरला मध्यरात्री बाराच्या सुमारास भंडारी (ता. खामगाव) येथे घडली. जितेंद्र मुळे (३५, रा. भंडारी, ता. खामगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जितेंद्र हातात भलामोठा कोयता घेऊन गावभर हिंडत होता. दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा त्याचा उद्देश असल्याने पिंपळगाव राजा पोलिसांनी मध्यरात्री त्याला अटक करून त्याच्याकडील कोयता जप्त केला.