बेपत्ता १६ वर्षांच्‍या मुलीचा शोध लागला, पण निघाली ६ महिन्यांची प्रेग्‍नंट!; पळवून नेणारा चक्‍क २ लेकरांचा बाप!; बुलडाणा तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत तरुणी, महिला, युवक बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. “बुलडाणा लाइव्ह’ वारंवार या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत असल्याने काही दिवसांपूर्वी पोलीस विभागाने बेपत्ता झालेल्या किती मुली, महिलांना परत आणले याची आकडेवारीही जाहीर केली होती. मात्र दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालल्याने पोलीस विभागानेही आता गांभीर्याने घेतले असून, अशा …
 
बेपत्ता १६ वर्षांच्‍या मुलीचा शोध लागला, पण निघाली ६ महिन्यांची प्रेग्‍नंट!; पळवून नेणारा चक्‍क २ लेकरांचा बाप!; बुलडाणा तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत तरुणी, महिला, युवक बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. “बुलडाणा लाइव्ह’ वारंवार या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत असल्याने काही दिवसांपूर्वी पोलीस विभागाने बेपत्ता झालेल्या किती मुली, महिलांना परत आणले याची आकडेवारीही जाहीर केली होती. मात्र दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालल्याने पोलीस विभागानेही आता गांभीर्याने घेतले असून, अशा बेपत्ता झालेल्यांचा शोध प्राधान्याने घेतला जात आहे. यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. तांत्रिक तपासाचीही मदत घेतली जात आहे. वेळप्रसंगी पथक पाठवून दुसऱ्या शहरातूनही पळवून नेलेल्या मुली, महिला परत आणल्या जात आहेत. मात्र बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यातून शोधून आणलेली १६ वर्षीय मुलगी चक्‍क सहा महिन्यांची गर्भवती निघाली आणि तिला पळवून नेणारा निघाला चक्‍क दोन लेकरांचा बाप! यामुळे पोलीसही चक्रावले असून, सामान्यांना हादरवून टाकणारी ही माहिती समोर आली आहे.

सचिन बजरंग घोंगडे (२९, रा. कोल्हापूर) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्‍याच्‍याविरुद्ध बलात्कार,अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. बुलडाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथील पूजा (काल्पनिक नाव) आणि कोल्हापुरातील सचिन यांची पुण्यात ओळख झाली. सचिन पुण्यात गवंडी काम करायचा. तो त्याच्या पत्नी व दोन मुलांसह भाड्याची खोली घेऊन राहायचा. पूजाचे आई- वडील हे सुद्धा पुण्यातच राहायचे व मजुरीचे काम करायचे. दोघांचेही घर शेजारी- शेजारी असल्यामुळे घरी येणे जाणे असायचे. तिथेच सचिनने पूजाला गळाला लावले. मात्र नंतरच्‍या काळात कोरोना व लॉकडाऊन लागले. त्‍यामुळे पुण्यात कामधंदा नसल्याने पूजाचे आई- वडील नांद्रा कोळी येथे राहायला आले. त्यामुळे सचिन आणि पूजाच्या भेटी बंद झाल्या. मात्र फोनवर त्यांचे बोलणे सुरूच होते. या प्रकाराची पूजाच्या आई- वडिलांना पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती. मार्च महिन्यात सचिन नांद्रा कोळी येथे आला होता. त्‍यानंतर २२ मार्च रोजी पूजा घरातून बेपत्ता झाली. आई- वडिलांना संशय आल्याने सचिनच्या विरोधात २७ मार्च रोजी अपहरणाची तक्रार देण्यात आली.

पळून गेलेली पूजा काही दिवस तिच्या मैत्रिणीकडे राहिली. नंतर सचिन तिला कोल्हापूर येथे घेऊन गेला. तिथे दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाली. त्यातून ती गर्भवती राहिली. सचिनला पहिली पत्नी असल्यामुळे त्याच्या पत्नीने या प्रकाराला विरोध केला. त्यामुळे सचिनने पुण्यात हडपसर येथे भाड्याने खोली घेतली व तिथे तो पूजासोबत राहू लागला. इकडे बुलडाणा ग्रामीण पोलीस सचिनचा शोध घेत होते. तांत्रिक माहिती आणी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरिक्षक एकनाथ बावस्कर यांच्या नेतृत्वातील एक पथक पुणे येथे रवाना झाले. पोलिसांनी पूजाला बुलडाणा येथे आणले. सचिन मात्र फरार होतात यशस्वी झाला होता.

बुलडाणा येथे आणल्यानंतर पोलिसांनी पूजाचा जबाब नोंदवला. त्यावरून सचिनने फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेल्याचे व बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. सचिनविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस गुन्हा दाखल करून पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. काल, २७ ऑगस्ट रोजी पुण्यातून सचिनला ताब्यात घेऊन बुलडाण्यात आणण्यात आले. आज, २८ ऑगस्‍टला त्‍याला न्यायालयासमोर हजर केले असता ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पीडित गर्भवती पूजाला बालगृहात पाठवण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक एकनाथ बावस्कर, पोहेकाँ अरुण सपकाळ, पो.ना. संदीप पाटील, पो.ना. वैशाली शिंगणे यांनी केला.