बुलडाण्यात क्लर्कचे घर फोडले; दागिन्यांसह ५९ हजारांचा माल लंपास

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील वैजीनाथनगरमध्ये वनविभागाच्या क्लर्कचे घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ५९ हजार रुपयांचा माल लंपास केला. ही घटना काल, १० सप्टेंबरला सकाळी समोर आली. बुलडाणा शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमोल वसंत मोरे यांनी या प्रकरणात तक्रार दिली. ते वैजीनाथनगरात राहतात. त्यांचे मूळ गाव साखळी बुद्रूक आहे. घराला ९ …
 
बुलडाण्यात क्लर्कचे घर फोडले; दागिन्यांसह ५९ हजारांचा माल लंपास

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील वैजीनाथनगरमध्ये वनविभागाच्‍या क्‍लर्कचे घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ५९ हजार रुपयांचा माल लंपास केला. ही घटना काल, १० सप्‍टेंबरला सकाळी समोर आली. बुलडाणा शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

अमोल वसंत मोरे यांनी या प्रकरणात तक्रार दिली. ते वैजीनाथनगरात राहतात. त्‍यांचे मूळ गाव साखळी बुद्रूक आहे. घराला ९ सप्‍टेंबरला रात्री कुलूप लावून ते साखळीला गेले होते. १० सप्‍टेंबरला सकाळी परतले असता त्‍यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले.

घरातील सोनी कंपनीचा एलईडी ४६ इंची टीव्‍ही (किंमत ३५ हजार) गायब होता. कपाटही उघडे होते. कपाटातील सोन्याची पोत (वजन ५ ग्रॅम,. किंमत २० हजार), सोन्याची ज्योती (वजन १ ग्रम किंमत ४ हजार) असा एकूण ५९ हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याचे दिसून आले. मोरे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तपास एएसआय श्री. सोनुने करत आहेत.