बायकोच्या तोंडात नवऱ्याने टाकले उंदीर मारण्याचे औषध; मोताळा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बायकोच्या तोंडात नवऱ्याने उंदीर मारण्याचे औषध टाकले. त्यामुळे अस्वस्थ अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. तिच्या जबाबावरून बोराखेडी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौ. प्रियांका संदीप दाभाडे (२६, शिरवा ता. मोताळा) हिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ९ सप्टेंबर रोजी ती माहेरवरून शिरवा येथे आली. दुपारी तीनच्या सुमारास नवऱ्याने …
 
बायकोच्या तोंडात नवऱ्याने टाकले उंदीर मारण्याचे औषध; मोताळा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बायकोच्या तोंडात नवऱ्याने उंदीर मारण्याचे औषध टाकले. त्यामुळे अस्वस्थ अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. तिच्या जबाबावरून बोराखेडी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सौ. प्रियांका संदीप दाभाडे (२६, शिरवा ता. मोताळा) हिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ९ सप्टेंबर रोजी ती माहेरवरून शिरवा येथे आली. दुपारी तीनच्‍या सुमारास नवऱ्याने तिच्यासोबत भांडण केले व उंदीर मारण्याचे औषध तिच्या तोंडात टाकले. नवरा बाहेर निघून गेला. थोड्या वेळानंतर नवरा बाहेरून घरी आला. त्यावेळी प्रियांकाची तब्येत बिघडली होती.

तिने नवऱ्याला दवाखान्यात घेऊन जा, असे म्हटले असता नवऱ्याने तू नाटक करत आहे, असे म्हटले. तिने आई- वडिलांना ही माहिती दिल्यानंतर त्‍यांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या जबाबावरून काल प्रियांकाचा पती संदीप रामधन दाभाडे (३०, रा. शिरवा) याच्याविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.