बाबोऽऽ महिला सर्पमित्राने विहिरीत उतरून पकडला १० फूट लांबीचा अजगर!

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोमेधरजवळील (ता. मेहकर) वरवंड येथील शेतकरी उत्तम पायघन यांच्या शेतातील विहिरीतून १० फुटी अजगराला सर्पमित्र वनिता बाेराडे यांनी पकडले. तब्बल १५ किलो वजनाचा हा अजगर, ५५ फूट खोल विहीर, त्यात ४५ फुटांपर्यंत पाणी…तरीही वनिता बोराडे यांनी धाडसाने कौशल्याचा वापर करत ही मोहीम आज, १९ सप्टेंबरला फत्ते केली. …
 
बाबोऽऽ महिला सर्पमित्राने विहिरीत उतरून पकडला १० फूट लांबीचा अजगर!

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोमेधरजवळील (ता. मेहकर) वरवंड येथील शेतकरी उत्तम पायघन यांच्‍या शेतातील विहिरीतून १० फुटी अजगराला सर्पमित्र वनिता बाेराडे यांनी पकडले. तब्‍बल १५ किलो वजनाचा हा अजगर, ५५ फूट खोल विहीर, त्‍यात ४५ फुटांपर्यंत पाणी…तरीही वनिता बोराडे यांनी धाडसाने कौशल्याचा वापर करत ही मोहीम आज, १९ सप्‍टेंबरला फत्ते केली.

पायघन यांच्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी अंकुश खरात, ओंकार वाडेकर गेले होते. त्यांना विहिरीतील पाण्यात भलामोठ्ठा अजगर तरंगत असल्याचे दिसले. त्‍याला पाहताच दोघेही घाबरून गेले. त्‍यांनी तातडीने पायघन यांना घटनेची माहिती दिली व सर्पमित्र वनिता बोराडे यांनाही कळवले. ही वार्ता गावात पसरताच अजगर पाहण्यासाठी विहिरीवर गर्दी झाली.

मेहकर तालुक्‍यातील हिवरा आश्रम येथून वनिता बोराडे शेतात दाखल झाल्या. धाडसाने विहिरीत उतरल्या, कोणत्याही उपकरणांची मदत न घेता सरळ हाताने या १० फुटी अजगराला हळूवारपणे पकडले. विहिरीत एका कंगणीचा सहारा घेऊन त्‍यांनी काही वेळातच थैलीत अजगराला बंद केले. वनविभागामार्फत याला पशु वैद्यकीय तपासणी करून सोडण्यात येणार असल्याचे त्‍यांनी उपस्थितांना सांगितले. सर्व शेतकरी बांधवांनी सोयाबीन सोंगणीवेळी सापापासून सावध राहण्याचे आवाहन वनिता बोराडे यांनी केले आहे.

बाबोऽऽ महिला सर्पमित्राने विहिरीत उतरून पकडला १० फूट लांबीचा अजगर!