फोटोतील व्यक्तीला ओळखत असाल तर नांदुरा पोलिसांना संपर्क करा…
नांदुरा (प्रविण तायडे) ः मलकापूर- नांदुरा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आशीर्वादसमोरील नांदुरा बुद्रूक शिवारातील शेत रस्त्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (वय अंदाजे ३५) आज, २० ऑगस्ट रोजी सकाळी आढळला अाहे. त्याचे वर्णन असे ः उंची ५.५ फूट, अंगात फिक्कट हिरव्या रंगाचे टी शर्ट ,कमरेत दोन पदरी काळा करदोरा. या व्यक्तीबद्दल माहिती असल्यास नांदुरा पोलिसांनी संपर्क साधण्याचे …
Aug 20, 2021, 20:57 IST
नांदुरा (प्रविण तायडे) ः मलकापूर- नांदुरा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आशीर्वादसमोरील नांदुरा बुद्रूक शिवारातील शेत रस्त्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (वय अंदाजे ३५) आज, २० ऑगस्ट रोजी सकाळी आढळला अाहे. त्याचे वर्णन असे ः उंची ५.५ फूट, अंगात फिक्कट हिरव्या रंगाचे टी शर्ट ,कमरेत दोन पदरी काळा करदोरा. या व्यक्तीबद्दल माहिती असल्यास नांदुरा पोलिसांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. संपर्कासाठी क्रमांक ः चंद्रप्रकाश इंगळे (सहायक फौजदार, मो.नं. 9130947982), अमर कस्तुरे (नापोकाँ, मो.नं. 7420946412), ओमसाई फाउंडेशन (मो.नं. 9422883911,9405778850).